About Us

गायकवाड हेल्थ केअर सेंटर मध्ये आम्ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यांची संपूर्ण काळजी घेतो, जिथे आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक उपचार एकत्र येतात. आमचे उद्दिष्ट आहे तुम्हाला ताजेतवाने करण्याचा परिपूर्ण अनुभव देणे, जिथे आधुनिक मसाज चेअर्स आणि प्राचीन कांस्य थेरपी एकत्र येतात, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण शरीर आणि मनाचा आराम मिळतो.


गायकवाड हेल्थ केअर सेंटर हे तुमच्या संपूर्ण शरीराच्या आणि मानसिक आरोग्याच्या देखभालीसाठी एक समर्पित केंद्र आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत तणाव, शारीरिक वेदना, आणि मानसिक थकवा हे सामान्य झाले आहेत, याचा विचार करून आम्ही अत्याधुनिक मसाज चेअर्ससह आरोग्य सेवा देण्याचा संकल्प केला आहे. आमच्या मसाज चेअर्समध्ये 4D मसाज तंत्रज्ञान, शून्य गुरुत्वाकर्षण मोड, हीट थेरपी, आणि वैयक्तिकृत मसाज सेटिंग्जचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्हाला एका क्लिकवर एक संपूर्ण मसाज अनुभव मिळतो. आमचा उद्देश केवळ शारीरिक तणाव कमी करणे नाही, तर तुम्हाला मानसिक विश्रांती आणि आराम देणे देखील आहे. तुमचे आरोग्य सुधारणासाठी सतत प्रयत्नशील आहोत. त्यामुळे टाईम्स हेल्थ केअर सेंटर मध्ये आजच भेट द्या, आणि तुमच्या शरीराला आणि मनाला ताजेतवाने करण्याचा अनुभव घ्या!

गायकवाड हेल्थ केअर सेंटर आपल्या सर्वांसाठी घेऊन आले आहे फूट मसाज मशीन. आम्ही आपल्या काही जुन्या पद्धती जिवंत करण्याच्या एकात्मिक प्रयत्न करीत आहोत. विशेष म्हणजे आम्ही जुन्या पारंपारिक पद्धती हाताळत आहोत. जॆ आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे, आपल्याला आपल्या शरीरासंदर्भात अनेक प्रकारच्या समस्या येत असतात त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील उष्णता वाढल्यामुळे देखील आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते तर काही जणांना डोळ्यां संदर्भात देखील समस्या येत असतात. दिवसभरातील कामाचा अति लोड ताण तणाव मानसिक टेन्शन यामुळे आपल्याला पुरेशी झोप घेता येत नाही त्यामुळे पुरेशी झोप न झाल्याने देखील त्रास होत असतो. यालाच आपण निद्रानाश असे देखील म्हणू शकतो. तरी या सर्वांसाठी आम्ही कास्य थाळी यंत्र हा आयुर्वेदिक उपचार घेऊन आलो आहोत. तसेच आता आधुनिक जीवनात आधुनिक तंत्रज्ञान घेऊन आलो आहोत. लोकांना कमी वेळेत आणि कमी मेहनतीत जास्त परिणाम हवे असतात. याच दृष्टिकोनामुळे, कास्य फूट मसाज मशीन तुमच्या सर्व अ‍ॅक्युप्रेशर पॉइंट्सवर पायाच्या सर्वोत्तम मसाजसह संपूर्ण शरीर आरामदायी बनण्याचा अनुभव देते.

मसाज चेअरचे फायदे

1. शून्य गुरुत्वाकर्षण मोडमुळे संपूर्ण आराम (Complete relaxation due to zero gravity mode)

शून्य गुरुत्वाकर्षण मोडमध्ये मसाज चेअर शरीराला पूर्ण आराम देतो, ज्यामुळे पाठीवरचा ताण कमी होतो आणि शरीरातील तणाव दूर होतो.

2. रक्ताभिसरण सुधारते (Improves Blood Circulation)

मसाजमुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील ऊतींना आणि पेशींना अधिक ऑक्सिजन मिळतो आणि संपूर्ण आरोग्य सुधारते.

3. स्नायूंमधील ताण आणि वेदना कमी होतात (Reduces muscle tension and pain)

मसाज चेअरमुळे पाठीचे, मान-खांद्यांचे, आणि इतर स्नायूंचे ताण आणि वेदना दूर होतात. खास करून लांब प्रवास किंवा ऑफिसमध्ये बसून काम केल्यामुळे निर्माण होणाऱ्या वेदनांवर हा उपाय फायदेशीर आहे.

4. चांगली झोप मिळते (Gets good sleep)

मसाजमुळे शरीराला पूर्ण विश्रांती मिळते, ज्यामुळे झोपेच्या समस्यांचा सामना करणाऱ्या लोकांना चांगली आणि शांत झोप मिळू शकते.

5. अधिक ऊर्जा आणि ताजेतवानेपणा (More energy and freshness)

मसाजमुळे शरीरातील ऊर्जा पुन्हा जागृत होते. तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते आणि शारीरिक तसेच मानसिक थकवा कमी होतो.

6. स्नायूंचा लवचिकपणा वाढवते (Increases muscle flexibility)

मसाज चेअर वापरल्याने स्नायूंची लवचिकता वाढते, ज्यामुळे शारीरिक हालचाली अधिक सहज होतात आणि तुम्हाला त्रास कमी होतो.

7. तणाव आणि ताण कमी करणे (Reducing stress and tension)

मसाज चेअरचा वापर केल्याने तुमच्या शरीरातील ताण आणि तणाव कमी होतो. मांसपेशींवर दाब दिल्यामुळे शरीराला ताजेतवाने वाटते आणि मन शांत होते.

8. स्नायूंचा लवचिकपणा वाढवते (Increases muscle flexibility)

मसाज चेअर वापरल्याने स्नायूंची लवचिकता वाढते, ज्यामुळे शारीरिक हालचाली अधिक सहज होतात आणि तुम्हाला त्रास कमी होतो.

9. अशक्तपणा आणि तणावपूर्ण जीवनशैलीसाठी उपाय (Remedies for Anemia and Stressful Lifestyle)

दिवसभराच्या कामामुळे येणारा थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी मसाज चेअर हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल होतो.

10. वेळ आणि पैसा वाचवा (Save time and money)

मसाज चेअर वापरल्याने तुम्हाला वेळ आणि पैसा दोन्ही वाचवता येतो. तुमच्या सोयीनुसार, तुमच्या वेळेनुसार तुम्ही मसाजचा आनंद घेऊ शकता.

कांस्य थाळीचे फायदे

1. एक्यूप्रेशर पॉइंट्स सक्रिय करते आणि त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करते.

3. शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी करण्यासाठी शरीरातील रक्त प्रवाह नियंत्रित करण्यास मदत होते.

5. डोळ्यातील थकवा दूर करते आणि स्नायूना उत्तेजित करते.

7. झोप पुर्ण होण्यास मदत होते.

9. केस गळती व केसातील कोंडा दूर होण्यास मदत होते.

11. ऍसिडीटीच्या समस्येवर फायदेशीर आहे.

13. रक्ताभिसरण नियंत्रित ठेवते.

2. शरीरातील हानिकारक तत्व कमी करण्यास मदत होते.

4. मधुमेह म्हणजेच शुगर याचे कारण पायातील संवेदना थांबविण्यास उपयुक्त आहे.

6. मुरुम, त्वचेचा कोरडेपणा किंवा त्वचा फाटणे कमी करते.

8. पचन प्रक्रियेस मदत होते.

10. गुडघेदुखी व सांधेदुखी कमी करते.

12. पायातील सुज कमी करते.

14. चेहऱ्यावर चमक आणते.

पारंपारिक आयुर्वेदाला तंत्रज्ञानाची जोड

शरीराची कोणतीही यंत्रणा बिघडली की, लगेचच आपल्याला काही लक्षणे जाणवू लागतात. डोकेदुखी, पोटदुखी, अंगदुखी, सांधेदुखी असे काही त्रास होऊ लागले की बरेचदा डॉक्टरकडे जाऊन लगेचच औषधोपचार घेण्याचा वेळ कधी कधी आपल्याकडे नसतो. शरीरासंदर्भातील ही दुखापत दुर्लक्षित करण्यासारखीही नसते. (किंबहुना त्याकडे दुर्लक्षही करु नये) अशावेळी काही अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट्स हे कामी येतात. काही असे अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट्स असतात जे दाबले की, काही सूक्ष्म वेदना पटकन कमी होतात. योग्य प्रेशर पॉईंट माहीत असेल तर त्याचा परिणाम हा लगेचच जाणवतो. आपल्या शरीरात वेगवेगळ्या वेदना थांबविण्यासाठी वेगवेगळे अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट्स आहेत.

वापरले जाणारे मसाज तेल

Coconut Oil ( लाकडी घाण्यावरील खोबरेल तेल)

आपल्या शरीरामध्ये पित्त दोष असतात हे पित्त नियंत्रणात नसेल तर अनेक आजार उदभवतात. पण जर नारळाच्या तेलाने तळपायाला मसाज केल्यास पित्त दोष नियंत्रणामध्ये येण्यास मदत होते. आपली त्वचा कायम तरूण राहावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. खोबरेल तेल तुमची ही इच्छा पूर्ण करू शकते . नारळाच्या तेलामध्ये तुमच्या जुन्या त्वचेला टवटवीत करण्याचा गुणधर्म आहे. या तेलामध्ये कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देण्यापासून ते अँटिऑक्सिडंट्ससह त्वचेचे संरक्षण करण्यापर्यंतचे गुणधर्म आहेत. त्याचप्रमाणे नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई आणि फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेतील नवीन त्वचेच्या पेशींच्या निर्मितीस प्रोत्साहन देतात.

Mustard Oil ( लाकडी घाण्यावरील मोहरीचे तेल)

काही जण आपल्या स्वयंपाकामध्ये मोहरीच्या तेलाचा वापर करतात. हे तेल केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचा आणि केसांच्या देखभालीसाठीही पोषक आहे. जर तुमचा चेहरा निस्तेज किंवा कोरडा दिसत असेल, तर हे तेल त्वचेसाठी अतिशय प्रभावी ठरू शकते. त्याच प्रमाणे सुंदर, काळेशार, घनदाट आणि केसांचे सौंदर्य टिकवून ठेवायचे असेल किंवा काळवंडलेल्या त्वचेच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास मोहरीचे तेल वापरणे हा फायदेशीर उपाय ठरू शकतो

Ghee ( साजूक तूप)

साजूक तूप हे वाताच्या समस्येसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हिवाळ्यामध्ये बहुतांश लोक सांधेदुखी आणि रात्री झोप न येण्याच्या समस्येमुळे त्रस्त असतात. या समस्या दूर करण्यासाठी आपण घरच्या घरी एक सोपा उपाय करू शकता. तुपाने मसाज केल्यास तुम्हाला गाढ झोप मिळू शकते. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये तूप उपलब्ध असते. स्वयंपाकामध्येही तुपाचा समावेश केल्यास पचनसंस्था निरोगी राहण्यास आणि शरीराला पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते. पण तुम्हाला हे माहीत आहे का की पायांच्या तळव्यांना तूप लावून मसाज केल्यास दुसऱ्या सकाळी उठल्यानंतर शौचासही स्वच्छ होते. यामुळे पोटाशी संबंधित समस्या देखील दूर होतात.

Sesame Oil ( लाकडी घाण्यावरील तिळाचे तेल )

आपल्या शरीरामधील कफ चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी तिळाच्या तेलाने तळपायाला मसाज केल्यास कफ कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदात तिळाचे तेल औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. हे त्वचेसाठी चांगले आहे असे म्हटले जाते आणि बहुतेकदा मसाजसाठी वापरले जाते कारण ते त्वचेमध्ये खोलवर पोसते

आणि तणाव कमी करण्यास मदत करते.याचा उपयोग सांध्यांच जळजळ कमी

करण्यासाठी आणि दातदुखी दूर करण्यासाठी केला जातो.

CONTACT US

Office - +91-8484830991 E-mail : timesedu78@gmail.com

Contact Info:

Times Information Technology


E-mail:

timesedu78@gmail.com


Office Address:

Shop No. 15, Mahad Trade Centre,

Near IDBI Bank, Front of Raj Pathology,

Mahad- Raigad.

Maharashtra India 402301.


Phone:

+91-84 84 83 09 91

+91-98 50 55 41 64

+91-91 75 60 97 98


Our Social Network

Times Information Technology


Office Address:

Shop No. 15, Mahad Trade Centre,Near IDBI Bank, Front of Raj Pathology,Mahad- Raigad.Maharashtra India 402301.

© 2023 Times Information Technology. All Rights Reserved